Anand Melava  Read Details  Science Projects Competition and Workshop Read Details 


Kerala Flood Relief Program

Project Details | All Projects | All Activities


After hearing about the Keral disaster, Vinita Tatke and Shirish Joshi, two volunteers of Maitri went to see and review the situation. 2 more volunteers joined them later. They were also accompanied by 2 persons understanding the local language.

Shirish experienced in relief work during 8 natural disasters including Tsunami and Konkan floods and
Vinita, an expert in social analysis, who has an experience of working in similar conditions with MAITRI along with many international organisations. They spent 8 days to understand the situation and to decide what should be our direction to work for rehabilitation. Please read the details on https://medium.com/@anilshidore/घराकडे-परत-चला-मैत्री-चा-केरळ-पुरानंतरचा-प्रतिसाद-a200f74ade34

 

Check this appeal created by one vounteer for Kerala. https://www.youtube.com/watch?v=CRtPWbqVoMY&t=4s 

 

Shirish and Vinita were sending us updtes about the happenings during their visit to the flood areas. We are making these updates available here. It would be good to read this to have better understanding of the situation and our chosen way of rehabilitation method.

२७ ऑगस्ट २०१८ “मैत्री” - केरळ पूरग्रस्त सहाय्य कार्यक्रम - वृत्तांत पहिला

केरळच्या महापूरग्रस्त भागात "मैत्री" चे दोन अनुभवी "मित्र" थोड्याच वेळात पोचतील.. शिरीष ज्यानी त्सुनामी, कोकण पूर अशा ८ राष्ट्रीय संकटात "मैत्री"च्या कामाचं नेतृत्व केलं आणि विनिता जिचा अशा कामाचा आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरचा अनुभव आहे असे दोघेजण आत्ता थोड्याच वेळात दाखल होतील.. घाई घाई करून काही तरी केल्यासारखं करून फोटो काढून घ्यायचे असं "मैत्री" कधीच करत नाही.. ते सविस्तर आढावा घेऊन कामाची दिशा (कुठे, काय, कसं, किती, केंव्हा करायचं?) ठरवतील. त्यांनी पाठवलेला पहिला "परिस्थिती अहवाल) ... *"आम्ही आज पहाटे केरळकडे निघालो. पूर व भूसखलनाने (landslides) झालेला विध्वंसाचे परिणाम व मैत्रीला काय काम करता येईल याची चाचपणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तिथे मदतकार्यात असलेल्या काही स्वयंसेवकांकडून कळलेल्या माहितीनुसार काही भागामध्ये पुराने घरे उद्धवस्त केल्यामुळे छावण्यांतून घरी गेलेले लोक परत छावण्यात परत येत आहेत. वायनाड जिल्ह्यात पूर परिस्थिती नसली तरी भूसखलनामुळे आदिवासींची घरे व जमिनी गेल्या आहेत. स्थानिक स्वयंसेवकांना सोबत घेऊन आम्ही वायनाड, थिस्सूर, पालक्कड, कोची या परिसरात जाण्याचा आमचा विचार आहे."* ...

२७ ऑगस्ट २०१८ “मैत्री” - केरळ पूरग्रस्त सहाय्य कार्यक्रम - वृत्तांत दुसरा

"मैत्री" ची अनुभवी टीम केरळात पोचून तिथल्या स्थानिक संस्थांबरोबर संपर्क करून नुकसानीचा नेमका अंदाज (लोकांची अडचण काय, गरज काय, कुठे) घेण्याचं काम करते आहे.. ते आत्ता पलक्कड जिल्ह्यात असून थ्रिसूर मधील चेल्लाकुडीला निघाले आहेत.

प्रत्येक नैसर्गिक संकटाचं स्वत:चं वेगळेपण असतं. ते देखील ते संकट कुठे आलं आहे आणि कधी झालं आहे ह्यावरही गोष्टी बदलतात. उदाहरणार्थ : भूकंप असेल तर हाडांचे शल्यविशारद लागतात, चक्रीवादळात घरांचं नुकसान होतं, अचानक पूर (flash flood) असेल तर जिवीतहानी होते, महापूरात लोकांना तात्पुरत्या निवासात हलवावं लागतं, तिथे "स्वच्छता, शौचालयं" अशा गरजा असतात..

केरळात आत्ता ह्या क्षणी पाणी ओसरल्यामुळे लोकांना आपापल्या घराची काळजी असल्यानं ते तात्पुरत्या निवासातून पुन्हा गावात गेले आहेत. साफसफाई करत आहेत. आपल्या चीजवस्तू शोधत आहेत.. छोटी मुलं, म्हातारे, महिला मात्र तात्पुरत्या निवासात आहेत. आता थोड्याच दिवसात साथीचे, त्वचेचे रोग सुरू होतील. त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे.. केरळात काही ठिकाणी पुराबरोबर भू-स्खलन (land slides) झाल्याचंही "मैत्री"चं निरीक्षण आहे. आत्ता “मैत्री”च्यासमवेत स्थानिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशिवाय काही करता येणार नाही. नुसतं धावत धावत जाऊन काहीतरी "टाकून" (dump) येणं चुकीचं ठरेल असं त्यांनी ठरवलं आहे.

केरळातील एक-दोन किंवा जशी ताकद असेल तशी थोडी दुर्लक्षित पण निसर्गानं भीषण तांडव घातलेली गावं निवडून तिथे थोड्या लांब पल्ल्याचं पुनर्वसनाचं काम करावं अशी "मैत्री" ची योजना आहे...

२८ ऑगस्ट २०१८ “मैत्री” - केरळ पूरग्रस्त सहाय्य कार्यक्रम - वृत्तांत तिसरा
नेनमारा पंचायत मधील चेरूमकाडू गावात “मैत्री” ची टीम पोचली.. ह्यागावातील उन्नीकृष्णन, गंगाधर आणि मणिकंदन ह्या तिघांच्या घरावर १६ ऑगस्टच्या पहाटे त्यांच्या घरामागे असलेला अख्खा डोंगरच कोसळला. त्या डोंगरावर जरा रबराची झाडं असल्यानं मातीचा डोंगर त्यामानानं कमी जोरानं आला. परंतु त्यांची घरं लाल मातीच्या चिखलात पूर्णपणे दबली. एकूण दहा जण मृत्यूमुखी पडले, फक्त तिघे वाचले. एक गंगाधर, जो जवळच्या हॉस्पिटलात उपचार घेतो आहे. त्याची बायको आणि मुलगी घराबाहेर जोरात धावले आणि वाचले.

अशाच कथा सर्वत्र आहेत.

गावातली सगळी माणसं शाळेत हलवण्यात आली होती. शाळा म्हणजे तात्पुरता निवारा बनवला होता. काही दिवस शाळेत राहिल्यावर आता माणसं घराकडे परतू लागली आहेत. सध्या लोक दिवसभर आपल्या घरापाशी जातात. जितकं जमेल तितकं साफ करतात. काही चीजवस्तू मिळताहेत का ते पहातात आणि रात्री आपल्या तात्पुरत्या निवासात (रिलीफ कॅंम्प) परत येतात.

स्थानिक भाषा येते अशा “मित्रांसोबत” “मैत्री” ची टीम काम करते आहे. अजून थोड्याच वेळात “मैत्री” जरा लांब पल्ल्याचं काय काम करता येईल ते ठरवेल.. सोबत दोन फोटो… एक भू-स्खलनाचा आणि दुसरं एका मुलानं त्या दिवशीच्या पुराचं काढलेलं चित्रं… किती बोलकं चित्रं आहे पहा...

२८ ऑगस्ट २०१८ “मैत्री” - केरळ पूरग्रस्त सहाय्य कार्यक्रम - वृत्तांत चौथा
चला, घराकडे परत चला.

“मैत्री” टीम थ्रिसूर जिल्ह्यातील माला मंडलातील कुळ्ळुर गावात पोचली. तिथले स्थानिक मनोज (गाईड) आणि कार्यकर्ता गौतम ह्यांच्याबरोबर त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या. कुळ्ळूर हे गाव चेल्लाकुडी नदीवर वसलं आहे. पूर आला तेंव्हा ह्याच नदीचं पात्र फुगून ते सुमारे ५ किलोमीटर्स पसरलं. २५,००० लोकवस्ती असलेल्या ह्या गावात ५,००० लोक भयानकपणे बाधीत झाले आहेत. त्यांची सुटका करून त्यांना ३ तात्पुरत्या निवासात (रिलीफ कॅम्प) हलवलं गेल होतं. साधारण तीन ते चार पुरुष पाणी चढलं होतं.

“आम्ही तिथे पोचलो तेंव्हा दुपारची वेळ होती. लोक कॅम्प मधून आपल्या घरापाशी येऊन काय काय शिल्लक उरलंय ते पहात होते.” विनिता, मैत्री स्वयंसेवक पुढे म्हणाली “त्या कॅम्पमध्ये त्यांना खायला मिळतं आहे. त्यांना घर साफ करायला साहित्य मिळतं आहे आणि सरकार त्यांना काही जीवनावश्यक गोष्टी देऊन त्यांनी त्यांच्या त्यांच्या घरात परत जावं अशा प्रयत्नात आहे.”

पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे कारण विहिरी गाळानं भरल्या आहेत. त्या साफ करून घेण्याचं “मैत्री”नी ठरवलं आहे. तसंच वस्ती पातळीवर सामुहिकपणे जेवण्याची सोय (कम्युनिटी किचन) सुरू करावं असा विचार आहे म्हणजे लोकांचं जास्तीत जास्त लक्ष आपापली घरं साफ करणं आणि पुन्हा जीवन पूर्वपदाला आणण्यावर राहील. फार मोठ्या प्रमाणावर गुरं मरून पडली आहेत. त्यांना उचलणे आणि साफ करणे ही कामं करण्यासाठी “मैत्री” स्थानिक लोकांना मदत करते आहे..

विहिरी साफ करण्यासाठी सध्या “मैत्री” ला एक पाणी उपसण्याचा पंप घ्यायचा आहे. ( रूपये १८,०००) तसंच तिथलं कम्युनिटी किचन चालवायला (इथे धान्य मिळतं आहे, उपलब्ध आहे) काही खर्च येणार आहे. सध्या तरी कामाचा हाच फोकस आहे. बाकी काही असेल तर कळवत राहूच.. 

 

Donate

The support from friends like you gives us a strength and keeps us going

Cheques can be given in the name of MAITRI

Donations to MAITRI are exempt under sec 80(G) of the Income Tax Act of Govt. of India

Please provide Name, PAN No, Mobile number & emailid when you donate online.


For online donations to MAITRI Click to donate Online in Indian Currency

(Indian Source)

HDFC Bank, Mayur Colony, Kothrud, Pune.
Account number- 01491450000152.
IFSC: HDFC0000149


(Foreign Source)
Individuals holding foreign passport and/or companies, organisations, trusts, foundations incorporated in a foreign country  Click to donate Online in Foreign Currency

Name of the beneficiary : MAITRI

Bank : State Bank of India. New Delhi Main Branch.
         11 Sansad Marg. New Delhi 110001. India

Beneficiary account number : 40166623586

SWIFT Code :  SBININBB104         IFSC : SBIN0000691

Purpose code : P1303

(Donor to mention the purpose code as "P1303" in the payment instruction when the transfer is effected) 


 MAITRI is a trust registered under the Public Trusts Act (# E 2898). 

Please provide Name, PAN No, Mobile number & emailid when you donate online.


Statutory Documents



Want to join as Volunteer?

Registered Address:
'Kalyan', 32, Natraj Society,
Karve Nagar,
Pune 411038
Office Address:
Flat No. 9, Mahadev Smruti,
Near Balshikshan School, Mayur Colony,
Kothrud, Pune 411038
 

Phone: 9309930010 

Email :  maitri1997@gmail.com

© 2024 Copyright Maitri Pune. All Rights Reserved. Designed by aplap software